व्हिडिओ : अमेरिकन पोलिसांची कृष्णवर्णीय तरुणीला मारहाण

अमेरिकेच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावताना रंगभेद करत श्वेतवर्णीयांना मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलीय. 

Updated: Jun 9, 2015, 04:20 PM IST
व्हिडिओ : अमेरिकन पोलिसांची कृष्णवर्णीय तरुणीला मारहाण title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावताना रंगभेद करत कृष्णवर्णीयांना मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलीय. 

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडलीय. पोलिसांनी कृष्णवर्णीय मुलींना केलेली ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झालीय. 

या व्हिडिओत पोलीस फर्ग्युसनमध्ये राहणाऱ्या मायकल ब्राऊन या 18 वर्षांच्या अश्वेत मुलीला मारहाण करताना दिसत आहेत. या मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं जमिनीवर ढकललं. ती मुलगी किंचाळत होती... पण, पोलीस अधिकाऱ्यानं मात्र तिची गय केली नाही. 

एका पूलपार्टीसाठी ही मंडळी इथं जमली होती. पण, हा स्विमिंग पूल सगळ्यांसाठी नव्हता... अश्वेत मुलं मुली अवैध पद्दतीनं पार्टीत सहभागी झाले होते, अशी तक्रार इथल्या काही रहिवाशांनी पोलिसांकडे केली होती. 

त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वंशभेदीय टिका करत श्वेतवर्णीय मुला-मुलींना मारहाण केली. या पार्टीत गोरे मुलं-मुलीही होती... पण, पोलिसांनी मात्र अश्वेत मुलींना पकडून त्यांना मारहाण केलीय. 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.