www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या ईशान्य भागात हिमवादळाच्या तडाख्यात ९ जणांना प्राण गमवावा लागला आहे. या भीषण वादळाने सुमारे ५० लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार झाला आहे.
ग्रेट लेक ते अटलांटिक या भागाला वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. या वादळामुळे हा परिसर 40 इंच बर्फाखाली गाडला गेला आहे. तर परिसरातल्या विमानतळावरही याचा परिणाम झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये अनेक झाडं कोसळलीत. तर दोन जणांचा बळी गेला.
बोस्टनमध्येही दोन जणांना प्राण गमवावा लागला. काही ठिकाणी एअरपोर्ट बंद ठेवावी लागली होती. तर अनेक ठिकाणचे रस्ते उखडले गेल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे.