www.24taaas.com, इस्लामाबाद
कुठलंही दांपत्य जेवायला हॉटेलमध्ये गेले की एकमेकांच्या बाजूला बसून गप्पांच्या रंगात जेवणाचा आनंद घेत असतात. पण पाकिस्तानातील मॅकडोनल्डमध्ये तर चक्क नवरा-बायकोलाही एकमेकांच्या बाजूला बसायची परवानगी दिली जात नाही.
नोमन अन्सारी या व्यावसायिकाने आपल्या ब्लॉगवरून मॅकडोनल्डमध्ये त्याच्यासोबत घडलेला प्रकार मांडल्याने हा मुद्दा जगासमोर आला आहे. नोमन आपल्या पत्नीसोबत मॅकडोनल्डमध्ये गेले असताना तिथल्या मॅनेजरने त्यांना त्यांच्या पत्नीच्या बाजूला न बसता समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले.
फॅमिली रेस्टॉरंटमध्ये नवरा-बायकोने एकमेकांच्या बाजूला बसणे हे इस्लामी संस्कृतीच्या विरोधात असल्याचे या मॅकडोनल्डच्या मॅनेजरचे म्हणणे असून पाकिस्तानातल्या प्रत्येक मॅकडोनल्डमध्ये हा एक महत्त्वाचा नियम ठेवण्यात आला आहे.