भारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार

 'फेसबुक‘च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, एका भारतीय तरुणीने त्याच्याशी संसार थाटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठले. 'फेसबुक'च्या माध्यमातून मेहरुनिस्सा नावाची २२ वर्षांची तरुणी पाकिस्तानमधील २४ वर्षांच्या इजाजच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिने थेट पाकिस्तान गाठले. तेथे त्याच्याशी विवाहही केला. 

Updated: Jan 13, 2016, 12:04 AM IST
भारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार title=

पेशावर :  'फेसबुक‘च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, एका भारतीय तरुणीने त्याच्याशी संसार थाटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठले. 'फेसबुक'च्या माध्यमातून मेहरुनिस्सा नावाची २२ वर्षांची तरुणी पाकिस्तानमधील २४ वर्षांच्या इजाजच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिने थेट पाकिस्तान गाठले. तेथे त्याच्याशी विवाहही केला. 

आता विवाह करून व्हिसाची मुदत संपल्यानंतर माणुसकीच्या नात्याने आपल्या व्हिसाची मुदत वाढविण्याचा अर्ज तिने पाकिस्तान सरकारकडे केला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचा अर्ज अमान्य करण्यात आला आहे.

व्हिसाची मुदत संपल्यानंतर तीन दिवसांनी १० जानेवारी रोजी तिने विवाह झाल्याचे जाहीर केले. स्वत:च्या मर्जीने विवाह केल्याचेही तिने सांगितले. तसेच जर मी भारतात परतले तर मुस्लिम संघटनांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे.