नवी दिल्ली : कोणत्याही देशाच्या लष्कर किंवा पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. पण एक असा देश आहे त्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी महिलंना व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेले लोक देशाची चांगली सेवा करू शकतात. लष्कर आणि सेनेत भरती करण्याचा प्रक्रिया एक सारखी असते. हा नियम आणि कायदा सर्वांना लागू होत असताना इंडोनेशिया पोलीस दलाला हा कायदा लागू नाही. इंडोनेशिया मानवाधिकार वॉचच्या एका रिपोर्टनुसार इंडोनेशिया पोलीस दलात महिलांच्या भरती पूर्वी त्यांची व्हर्जिनिटी चाचणी केली जाते. महिलांना भरतीवेळी ‘टू-फिंगर’ चाचणीतून जावे लागते.
सीएनएनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार इंडोनेशियामध्ये एखाद्या महिलेला लष्कर किंवा पोलीस दलात सामील व्हायचे असेल तर तिला व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते. नियमांनुसार महिलेला अविवाहीत असणे आवश्यक आहे. हा काही नवा नियम नाही. येथील राष्ट्रीय पोलीसच्या वेबसाइटवर याचा उल्लेख आहे.
मानवाधिकार वॉचने आपला अहवाल तयार करण्यापूर्वी इंडोनेशियाच्या ६ शहरांच्या महिला पोलिसांशी बातचित केली. या अहवालात उल्लेख केलेल्या सर्व महिलांनी सांगितले की, त्यांनी भरतीवेळी ‘टू-फिंगर टेस्ट’ करून घ्यावी लागली. ही टेस्ट खूपच भयानक आहे.
या संदर्भातील माहिती इंडोनेशियाच्या एका सिनीअर अधिकाऱ्याला विचारण्यात आले. त्यावर त्याने सांगितले की, ही चाचणी केवळ महिलांचे जननांगात रोग तर नाही ना हे तपासण्यासाठी केली जाते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.