सद्दामला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची क्रूर हत्या

इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशाचंच अपहरण करून त्याला फासावर चढवण्यात आलंय. इराकमध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘आयएसआयएस’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी ही हत्या घडवून आणलीय.

Updated: Jun 24, 2014, 08:42 PM IST
सद्दामला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची क्रूर हत्या title=
डावीकडे न्यायाधीश रहमान, उजवीकडे सद्दाम हुसेन

बगदाद : इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशाचंच अपहरण करून त्याला फासावर चढवण्यात आलंय. इराकमध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘आयएसआयएस’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी ही हत्या घडवून आणलीय.

सद्दाम हुसेन याचा एकेकाळचा विश्वासू सहकारी समजल्या जाणाऱ्या इब्राहिम अल दौरी याच्या फेसबुक अकाऊंटवर हा दावा करण्यात आलाय. तसंच जॉर्डनच्या एका खासदारानंही आपल्या फेसबुक पेजवर अशाच प्रकारचा दावा केलाय.

दरम्यान, इराक सरकारनं मात्र या मुद्द्यावर अजून काहीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. त्यांच्याकडून ना या हत्येची पुष्टी करण्यात आली ना कुणी या मुद्याला खोडून काढलं.

हत्या करण्यात आलेले न्यायाधीश रहमान हे ‘कूर्द’ आहेत. 2006 साली त्यांनी सद्दामला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

महत्त्वाचं म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सनं, इराकमध्ये सध्या सुरु असलेल्या हिंसेमध्ये दौरी याचाच हात असल्याचं म्हटलंय. दौरी 2003 मध्ये इराकवर अमेरिकेकडून हल्ला होईपर्यंत इराकी कमांड काऊन्सिलचे डेप्युटी चेअरमन होते. 2007 साली त्यांचं नाव इराकच्या एका बंदी घालण्यात आलेल्य पक्षाचा नेता म्हणूनही समोर आलं होतं.    

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.