'मुलाचं कृत्य लाजीरवाणं' - जॅकी चॅन

 मुलाच्या कृत्याची लाज वाटतेय, ही दु:खदायक आणि लाजीरवाणी घटना असल्याचं जॅकी चॅनने म्हटलं आहे. अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅनचा मुलगा जेसी जॅनला ड्रग्स प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर जॅकी चॅनने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेसी चॅनला सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Updated: Jan 9, 2015, 04:30 PM IST
'मुलाचं कृत्य लाजीरवाणं' - जॅकी चॅन title=

शांघाय :  मुलाच्या कृत्याची लाज वाटतेय, ही दु:खदायक आणि लाजीरवाणी घटना असल्याचं जॅकी चॅनने म्हटलं आहे. अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅनचा मुलगा जेसी जॅनला ड्रग्स प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर जॅकी चॅनने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेसी चॅनला सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आलीय.

जेसी चॅनने नशा करणाऱ्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून, चीनमधील न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आहे, जेसी चॅनच्या घरावर छापा टाकून १०० ग्रॅन मॅरिज्युयाना हस्तगत करण्यात आलं होतं.
 
चीनमधील न्यायालयाने 32 वर्षीय जेसी चॅनला नशा करणाऱ्यांना आश्रय दिल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात जेसी चॅनच्या घरावर छापा टाकून 100 ग्रॅम मॅरिजुआना जप्त केलं होतं
 
मुलाला शिक्षा झाल्याने जॅकी चॅन अतिशय दु:खी झाला आहे. ही घटना दु:खदायक आणि लाजिरवाणी असल्याचं त्याने म्हटलं आहे. जेसी चॅनला २ हजार युआनचा दंड ठोठावण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.