पॅरिस हल्ला : मुस्लिम पोलिसाला दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या

दहशतवादाचा काळा चष्मा लावलेल्यांना जात पात धर्म काहीच दिसत नाही. ते केवळ मानवतेची हत्या करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पॅरिस हल्ल्यात पॉइंट ब्लँक रेंजवरून ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळ्या घालण्यात आल्या आणि तो व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला तो अधिकारी मुस्लिम होता. 

Updated: Jan 9, 2015, 03:07 PM IST
पॅरिस हल्ला : मुस्लिम पोलिसाला दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या title=

पॅरिस : दहशतवादाचा काळा चष्मा लावलेल्यांना जात पात धर्म काहीच दिसत नाही. ते केवळ मानवतेची हत्या करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पॅरिस हल्ल्यात पॉइंट ब्लँक रेंजवरून ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळ्या घालण्यात आल्या आणि तो व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला तो अधिकारी मुस्लिम होता. 

Embedded image permalink
अहमद मेराबेत

आपल्या भावाच्या आकस्मिक निधनानंतर त्याचा भावाने एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले, की मी इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहिला. मी त्याचा आवाज ओळखला. हा एक भ्याड हल्ला होता. एखाद्या माणसाला अशा प्रकारे मारणे. त्यांनी पाहिलं नाही की तो मुस्लिम आहे की नाही. त्यांनी फक्त त्याच्या अंगावरील पोलिसांचा युनिफॉर्म पाहिला आणि त्याला ठार मारले. त्याने पोलिसांचा युनिफॉर्म घातला होता आणि तो त्यावेळी फ्रान्सचे प्रतिनिधीत्व करत होता. ते माणसं नव्हते, त्यांना जरी वाटते की ते माणसं आहेत पण माझ्यामते ते माणसं नाहीत. जो मारला गेला तो खरा माणूस होता.

नेहमी हसतमुख राहणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते अहमद मेराबेत. 'शार्ली हेब्दो' या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जात असताना एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारात तो जखमी झाला होता, पण तो ठार झाला की नाही हे पाहण्यासाठी एक दहशतवादी त्याच्या दिशेने गेला आणि त्याला पाइंट ब्लँक रेंजवरून डोक्यात गोळ्या घातल्या. 

दहशतवादी त्याच्या दिशेने येत असताना या ४२ वर्षीय मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याने हात वर करून विचारले, तुम्हांला मला ठार मारायचे आहे का? त्यावर बंदूकधाऱ्याने म्हटले, ओके चीफ.... आणि त्याला पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळ्या घातल्या आणि पळून गेले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.