रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला सेक्स टेपसाठी 1 कोटी डॉलरची ऑफर

मनोरंजन कंपनी विविड एंटरटेन्मेंटनं रिअॅलिटी टिव्ही स्टार केली जेनला बॉयफ्रेंड टायगासोबत सेक्स टेप बनविण्यासाठी एक कोटी डॉलरची ऑफर देण्यात आलीय. केली नुकतीच 18 वर्षांची झालीय. या कंपनीनं केलीची सावत्र बहिण किम कर्दाशिया आणि गायक-अभिनेता रे जेची वादग्रस्त सेक्स टेप प्रसिद्ध केली होती. 

Updated: Aug 18, 2015, 05:29 PM IST
रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला सेक्स टेपसाठी 1 कोटी डॉलरची ऑफर title=

लॉस एंजिलिस: मनोरंजन कंपनी विविड एंटरटेन्मेंटनं रिअॅलिटी टिव्ही स्टार केली जेनला बॉयफ्रेंड टायगासोबत सेक्स टेप बनविण्यासाठी एक कोटी डॉलरची ऑफर देण्यात आलीय. केली नुकतीच 18 वर्षांची झालीय. या कंपनीनं केलीची सावत्र बहिण किम कर्दाशिया आणि गायक-अभिनेता रे जेची वादग्रस्त सेक्स टेप प्रसिद्ध केली होती. 

वेबसाईट 'टीएमझेड डॉट कॉम'नुसार कंपनीचे मालक स्टीव हर्श यांनी सांगितलं की, किमच्या सेक्स टेपनं तिच्या करिअरला नवी उभारी दिली आणि केरीसाठीही ही मोठी संधी असेल.

एक दुसरी पॉर्न कंपनी बँगयूलेटरनं सुद्धा केलीला 22 मिनिटांच्या व्हिडिओसाठी 18 लाख डॉलरची ऑफर दिलीय. सोबतच हे आश्वासन दिलंय की, जर तिनं ही ऑफर स्वीकारली तर ती तिची बहिण किम आणि प्रसिद्ध समाजसेवक पॅरिस हिल्टन पेक्षा जास्त प्रसिद्ध होईल.  

तर दुसरीकडे डिजिटल प्लेग्राउंड नावाच्या आणखी एका कंपनीनं केलाला आपली ब्रँड अॅम्बेसेडर व्हायची ऑफर दिलीय. केली मात्र अजून कुणालाही उत्तर दिलं नाहीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.