लादेनने घेतली गांधीजींपासून एका गोष्टीची प्रेरणा

ओसामा बिन लादेनने आपल्या समर्थकांना महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला होता. ही बाब एक ऑडीओ टेपव्दारे स्पष्ट झाली आहे. परदेशी वस्तूंचा बहिष्कार करून गांधींजींनी इंग्रजांशी संघर्ष केला, त्याप्रमाणे अमेरिकन वस्तूंचा त्याग करा, असा सल्ला १९९३ मध्ये ओसामाने आपल्या साथीदारांना दिला होता.

Updated: Aug 18, 2015, 02:44 PM IST
लादेनने घेतली गांधीजींपासून एका गोष्टीची प्रेरणा  title=

लंडन : ओसामा बिन लादेनने आपल्या समर्थकांना महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला होता. ही बाब एक ऑडीओ टेपव्दारे स्पष्ट झाली आहे. परदेशी वस्तूंचा बहिष्कार करून गांधींजींनी इंग्रजांशी संघर्ष केला, त्याप्रमाणे अमेरिकन वस्तूंचा त्याग करा, असा सल्ला १९९३ मध्ये ओसामाने आपल्या साथीदारांना दिला होता.

ओसामा बिन लादेनने २००१ मध्ये अफगाणिस्तान सोडलं होतं, तेव्हा मोठ्या प्रमाणात ऑडीओ कॅसेटस सापडल्या होत्या. हे

१९९३ च्या भाषणात समर्थकांना उद्देशून ओसामा बिन लादेन म्हणाला होता, इंग्लंडचं उदाहरण पाहा, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य कसं उभं केलं, की ज्या साम्राज्यात सूर्य मावळत नव्हता. मात्र इंग्लंडला तेव्हा माघार घ्यावी लागली जेव्हा गांधींजींनी परदेशी वस्तूंचा बहिष्कार केला. आपण आज अमेरिकेसोबत असंच केलं पाहिजे.

ज्या ऑडीओ टेप मिळाल्या आहेत, त्यात ओसामाने १९९६ पर्यंत हिंसेचा कोणताही उच्चार केलेला नव्हता, मात्र जेव्हा १९९६ मध्ये त्याला सूडानमधून निर्वासित करण्यात आलं, तेव्हा त्याच्या विचारात बदल झाले असावेत. गांधींजींबद्दल ओसामा १९९३ मध्ये बोलला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.