www.24taas.com
26/11च्या मुंबई हल्ल्याच्या कटात ओसामा बिन लादेनही सामील होता. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं, मुंबईवरील हल्ल्यापूर्वी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद हा ओसामा बिन लादेनच्या संपर्कात होता.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या सईदवर 50 कोटींचं बक्षिस लावण्यात आलंय. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईवरील हल्ल्यात ओसामाची भूमिका खूप महत्वाची होती. पाकिस्तानातील एबोटाबाद येथे अमेरिकन सैन्याने ओसामा बिन लादेन याला संपवलं. या ठिकाणी त्यांना अनेक कागदपत्रं मिळाली होती. या कागदपत्रांवरून अमेरिकन गुप्तचर संस्थेने माहिती दिली की ओसामाचाही मुंबईवरील हल्ल्यात सहभाग होता.
इस्लामाबाद नजीक असलेल्या अबोटाबादमध्ये एका घरात ओसामा बिन लादेन लपलेला होता. अमेरिकन सैन्याने त्याच्या बंकरवर हल्ला करून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. ओसामा बिन लादेनचा मुंबईच्या हल्ल्याशी संबंध असल्याचं समजल्यामुळे आतंकवादी संस्थांचं जाळं किती मोठं आहे याची माहिती या कागदपत्रांवरून काढली जात आहे.