नवी दिल्ली : राजीव गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एलटीटीईच्या माजी कमांडरनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांवर राजीव गांधी यांच्या मातोश्री अर्थात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा वरदहस्त होता, असा गौप्यस्फोट या कमांडरनं केला आहे.
आजवर इंदिरा गांधींनींच प्रभाकरनवर वरदहस्त ठेवला होता का असं नेहमी बोललं जायचं. याविषयी कॅमेरावर बोलायला आजवर कुणीही धजावलं नाही. प्रभाकरनचा विश्वासू मानला जाणारा कुमारन पद्मनाथन यानंच झी मीडियावर हा खुलासा केलाय. सुरुवातीच्या काळात लिट्टेला भारतानंच पोसलं आणि त्यावेळी भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी.
तामिळींना न्याय देण्याच्या नावाखाली इंदिरा गांधींनीच या दहशवादी संघटनेचं पालनपोषण केलं आणि पुढे जाऊन याच संघटनेनं इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गाँधी यांची हत्या केली. लिट्टेच्या खातम्यानंतर कुमारनला मलेशियातून अटक करण्यात आली.
तो केपी नावानं ओळखला जातो. केपीनंच लिट्टेमध्ये आत्मघाती बॉम्ब आणि पकडले गेल्यास सायनाईड कॅप्सुल खाण्याचं ट्रेनिंग दिलं होतं. सध्या केपी श्रीलंकेतल्या जाफनामध्ये अनाथ मुलांसाठी शाळा चालवतो.