मेक्सिको सिटी : आपण बऱ्याचवेळा फोटो पाहून समोरच्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावू करतो. मात्र, मेक्सिकोतील महिला सिंगरच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे.
आपल्या सौंदर्यांने सर्वांना भूरळ घालणारी सिंगर थालिया हिला पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही. ती केवळ २५ ते ३० वयाची असेल असेच वाटते. मात्र, ती ४४ वर्षांची आहे. तिच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा झालेत. त्याच्या फिटनेसचे राज काय, असा सवाल केल्यानंतर तिने अजब उत्तर दिले.
तिने आपल्या मादक सौंदर्याचे राज सांगताना म्हटले की, सेक्स. तिने सांगितले माझ्या फिटनेस टीचरने हा पर्याय सुचवला. तेव्हापासून आपण सेक्सला जास्त महत्व दिलेय. जास्त सेक्स लोकांना जास्त सुंदर बनवतो. मी रात्री कमीत कमी ५० वेळा चरमोत्कर्षपर्यंत पोहोचते.
४४ वर्षीय सिंगर थालियाचा पती टॉमी मोटोला हाही एक संगीतकार आहे. तो ६७ वर्षांचा आहे. थालियाने सेक्सला जीवनातील महत्वाचे एक अंग असल्याचे सांगितले. तुम्ही भले जिमला जात असाल तरीही सेक्स करणे जरुरी आहे. कारण शरीरातील नको असलेले प्रोटीन बाहेर पडतात. त्यामुळे लोक जास्त आनंदी राहतात.