पदभार सांभाळल्यानंतर २४ तासांत मेक्सिकोच्या महापौरांची हत्या

मेक्सिकोमध्ये नवनिर्वाचित महिला महापौराला पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची हत्या करण्यात आलीय. 

Updated: Jan 3, 2016, 11:44 AM IST
पदभार सांभाळल्यानंतर २४ तासांत मेक्सिकोच्या महापौरांची हत्या title=

क्यूर्नावाका (मेक्सिको) : मेक्सिकोमध्ये नवनिर्वाचित महिला महापौराला पदभार सांभाळल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची हत्या करण्यात आलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिसेलो मोता यांनी शुक्रवारी टेमिक्ससो शहराच्या महापौरपदाची शपथ घेतली. पदभार स्वीकारून अवघे २४ तास लोटत नाहीत तोच काही बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, मोता यांची हत्या करणाऱ्या संशयित हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याची माहिती मोरेलोस राज्याचे गर्व्हनर ग्रेसो रामिरेज यांनी दिली.