मलेशियाच्या `त्या` विमानाचं अपहरण - वृत्तसंस्था

गेल्या आठ दिवसांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाईन्सचं `एमएच३७०` या विमानाचं अपहरण झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. या विमानात २३९ प्रवासी आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 15, 2014, 11:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, क्वालालांपूर
गेल्या आठ दिवसांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाईन्सचं `एमएच३७०` या विमानाचं अपहरण झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. या विमानात २३९ प्रवासी आहेत.
इंटरनॅशनल न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, हायजॅक करणाऱ्याला विमान उडविण्याचा अनुभव आहे. या अपहरणाच्या कटात एकापेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे. विमान 'हाय जॅक' केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कम्युनिकेशन डिव्हाईस बंद केलंय. या अपहरणामागचा उद्देश काय असू शकतो, हे अजून समजलेलं नाही.
या विमानाचं `सर्च ऑपरेशन`नं आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केलाय. त्यानंतर मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. आठवडाभर तपास केल्यानंतरही या विमानाचा पत्ता लागला नाही... यामुळे, शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या विमानाचं अपहरण झाल्याचं कबूल केलंय... `एपी` या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीय.
बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईनच्या एमएच ३७० ह्या फ्लाईटचं नेमकं झालं तरी काय या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही..शनिवारी ८ मार्चला या मलेशियन एअरलाईन्सच्या या विमानानं रात्री बारा वाजून २१ मिनिटांनी क्वालालंपूरहून उड्डाण केलं..ते चीनमधील बीजिंगला सकाळी साडेसहा वाजता पोहोचणार होतं...या विमानात २२७ प्रवाशी आणि १२ विमान कर्मचारी होते. पण उड्डाण केल्य़ानंतर एक-दोन तासातच व्हिएतनामजवळ या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचं काय झालं हे एक मोठं गूढच बनलंय. बेपत्ता झालेलं विमान रडारहून गायब झाल्यानंतरही चार तास हवेत उडत होतं, असं वृत्त वॉल स्ट्रिट जर्नल या वृत्तपत्रानं दिलं होतं.
या विमानाची शोधमोहिम अंदमान-चेन्नईपर्यंत वाढवण्यात आली होती. भारतीय नौदलाची जहाजं आणि विमानांनीही या शोधमोहिमेत सहभाग घेतलाय. या शोधमोहिमेत तब्बल १३ देशांचा सहभाग आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.