भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे. 

Updated: May 7, 2015, 07:59 PM IST
भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली title=

नवी दिल्ली: नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे. 

सॅटेलाईटच्या साह्यानं भूकंपानंतर नेपाळचं पहिलं दृष्यं समोर आलं आहे. त्यात स्पष्ट झालं आहे की, काठमांडूजवळ जमिनीचा जवळपास एक मीटर भाग वर उचलला गेला आहे. त्याद्वारे तर्क लावता येईल की भूकंप एवढा विनाशकारी का होता.

सॅटेलाईट डेटामध्ये सांगण्यात आलं आहे की, जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट उंची कमी झाली आहे. 

२५ एप्रिलला आलेल्या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. त्यात जवळपास ७५०० पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तसंच १७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. २,७९,२३४ घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर २,३७,०६८ घरांचं थोड्या प्रमाणात नूकसान झालं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.