www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे मुंबईतील `अँटिलिया'` हे गगनचुंबी आलिशान निवासस्थान जगातील सर्वांत महागडे घर ठरले आहे. याबाबत `फोर्ब्स`ने एक यादी प्रसिद्ध केली आहे.
अंबानी यांच्या २७ मजली, चार लाख चौरस फूट अशा आलिशान टोलेजंग घराला अॅंटलांटिकमधील अँटिला या एका काल्पनिक बेटाचे नाव देण्यात आले आहे. फोर्ब्सच्या सर्वांत महागड्या घरांच्या यादीत अँटिलिया'ने पहिले स्थान पटकाविले आहे.
जगातील अत्यंत महागड्या मालमत्तेचा मान अद्याप मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील `अँटिलिया'`कडेच आहे,` असे फोर्ब्सने म्हटले आहे. या घराची किंमत शंभर ते दोनशे कोटी डॉलर असण्याची शक्यता आहे. तर `फोर्ब्स`ने नुकत्याच जाहीर केलेल्या महागड्या घरांच्या एका यादीमध्ये भारतीय वंशाचे पोलाद उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या लंडनमधील निवासस्थानाचाही समावेश आहे.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.