बुडालेल्या जहाजातून 28 किलो सोनं बाहेर काढण्यात यश

अमेरिकेत सर्वात दुर्देवी घटनेत दक्षिण कॅरोलीनात 1857 साली एक जहाज बुडालं होतं. या जहाजातून 28 किलो सोनं बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Updated: May 7, 2014, 04:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
अमेरिकेत सर्वात दुर्देवी घटनेत दक्षिण कॅरोलीनात 1857 साली एक जहाज बुडालं होतं. या जहाजातून 28 किलो सोनं बाहेर काढण्यात यश आलं आहे.
एवढ्या मोठ्या कालखंडानंतर सोनं बाहेर काढण्यात यश आलं आहे.
एसएस सेंट्रल अमेरिका नावाचं हे जहाज कॅलिफोर्नियातून सोनं आणत असतांना, वादळात सापडलं आणि जहाजाला जलसमाधी मिळाली, या घटनेत 425 लोक मारले गेले.
1980 आणि 1990 च्या दशकात हे जहाज शोधण्याची मोठी मोहिम राबवण्य़ात आली मात्र, कायदेशीर वादानंतर हे शोधकाम बंद झालं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.