नवी दिल्ली : अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून रिचर्ड राहुल वर्मा शनिवारी शपथ घेणार आहेत. ते नॅन्सी पॉवेल यांची जागा घेतील. हे पद स्वीकारणारे रिचर्ड वर्मा हे पहिले भारतीय वंशाचे अमेरिकन व्यक्ती आहेत.
अमेरिकी सिनेटने वर्मा यांची गेल्या आठवड्यात आवाजी मतदानाने निवड केली होती. आज होणाऱ्या वर्मा यांच्या शपथग्रहण समारंभाचे यजमानपद अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी असतील. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे येत्या २६ जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यापूर्वीच राजदूत म्हणून कार्यभार सांभाळणारे वर्मा हे दिल्लीत येऊन त्यांची अधिकारविषयक कागदपत्रे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सोपवतील, अशी अपेक्षा आहे.
४६ वर्षीय वर्मा भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. वर्मा यांचे आई-वडील १९६०च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले होते. २००८च्या सिनेटरपदाच्या निवडणुकीपासून ओबामांशी त्यांचा संबंध आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.