वेलिंग्टन : किवींचा देश म्हणून ओळख असलेल्या न्यूझीलंडने घेतलेल्या सार्वमतात देशातील नागरिकांनी बहुमताने देशाचा झेंडा बदलण्यास नकार दिला आहे.
न्यूझीलंड हा देश भारताप्रमाणेच ब्रिटीशांची वसाहत होता. या देशाचा झेंड्यावर इंग्लंडच्या युनियन जॅकचा प्रभाव तर होताच, शिवाय हा झेंडा ऑस्ट्रेलियाच्या झेंड्याप्रमाणेच दिसत असल्याने आजही अनेकांना तो ओळखण्यात अडचणी येतात.
New Zealanders have decided... #nzflag pic.twitter.com/ND85D84pFL
— nzherald (@nzherald) March 24, 2016
गेली अनेक वर्षे आपल्या देशाचा झेंडा बदलला जावा यासाठी काही लोकांनी सरकारवर जोरदार दबाव आणण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे तेथील सरकारने काही दिवसांपूर्वी देशाने नवा झेंडा स्वीकारावा का याची चाचपणी सुरू केली. त्यानंतर लोकांकडून नव्या झेंड्यासाठी काही डिझाईन मागवले गेली.
विरुद्ध मत असलेल्या लोकांनी मात्र न्यूझीलंडचा पारंपरिक झेंडाच राहावा यासाठी प्रचार सुरू केला. शेवटी तेथील सरकारने लोकांकडून निवडले गेलेले एक डिझाईन आणि सध्याचा झेंडा यात सार्वमत घेण्याचा निर्णय घेतला. या सार्वमतात ५६% लोकांनी आपली मते पारंपरिक झेंड्याच्या बाजूने टाकली, तर ४३% लोकांनी नवीन झेंड्याचा पर्याय स्वीकारला.
New Zealand votes to keep current flag with 56.6% of the vote, compared to 43.2% for Lockwood #nzflag pic.twitter.com/1Ao6WW1OmD
— Elle Hunt (@mlle_elle) March 24, 2016
दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेवर न्यूझीलंड सरकारने २६ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च केला. या खर्चावर काही जणांकडून टीकाही झाली. परंतु, लोकशाही मार्गाने जाण्यासाठी इतका खर्च करणे गरजेचे असल्याचे तिथल्या सरकारने म्हटले आहे.