ब्रसेल्स हल्ल्यातील जखमी निधीचा फोटो व्हायरल

बेल्जियमच्या ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही तरुणी मुंबईची निधी चाफेकर असून जेट एअरवेजची ती कर्मचारी आहे. सोशल मीडियावर निधीसाठी #PrayForNidhi हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. 

Updated: Mar 23, 2016, 03:07 PM IST
ब्रसेल्स हल्ल्यातील जखमी निधीचा फोटो व्हायरल title=

ब्रसेल्स : बेल्जियमच्या ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या या महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही तरुणी मुंबईची निधी चाफेकर असून जेट एअरवेजची ती कर्मचारी आहे. सोशल मीडियावर निधीसाठी #PrayForNidhi हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. 

निधीचा हा फोटो जगभर शेअर होतोय. जेट एअरवेजमध्ये काम करणारी निधी मुंबईच्या अंधेरी भागात राहते. गेल्या १५ वर्षांपासून ती एअलाईन्समध्ये काम करतेय. तिच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार निधीवर रुग्णालयात उपचार सुरु असून ती तिच्या जीवाचा धोका टळलाय. मात्र स्फोटामुळे जबरदस्त शॉक बसलाय. 

मंगळवारी सकाळी ब्रसेल्स विमानतळावर दोन तर बेल्जियमच्या राजधानीतील मालबिक मेट्रो स्टेशनजवळ एक बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एकूण ३५ जण ठार झालेत.