'बोको हरमच्या दहशतवाद्यांसोबत सेक्ससाठी तयार, पण...'

Updated: Jun 26, 2014, 03:41 PM IST
'बोको हरमच्या दहशतवाद्यांसोबत सेक्ससाठी तयार, पण...' title=

 

अबुजा : नायजेरियातील बोको हरम या दहशतवादी संघटनेच्या तावडीतून जवळपास 300 मुलींच्या सुटकेच्या बदल्यात एका पॉप सिंगरनं आपलं कौमार्यचं दहशतवाद्यांच्या समोर ठेवलंय.

आपल्या बेताल वक्तव्यांबद्दल बऱ्याचदा चर्चेत असलेल्या पॉप गायिका अडोकिए हीनं आपण दहशतवाद्यांसमोर आपलं कौमार्य ठेवलंय. पण, याबदल्यात दहशतवाद्यांनी त्या 300 विद्यार्थिनींची सुटका करावी, असं अडेकिए हिनं म्हटलंय. ज्या मुलींना बंदी बनवण्यात आलंय त्यांचं वय अवघं 12 ते 15 वर्ष आहे. नकळत्या वयातींल या मुलींची सुटका व्हायला हवी, असंही तिनं म्हटलंय.

‘अपहरण करण्यात आलेल्या मुलींचं वय सेक्ससाठी योग्य नाही. मी या बाबतीत जास्त अनुभवी आहे. त्यामुळे मी माझं कौमार्यच पणाला लावतेय. पण, या बदल्यात त्या मुलींना सोडून दिलं जावं... या मुलींच्या सुटकेसाठी मला दररोज रात्री 10 ते 12 लोकांसोबत सेक्स करायलाही मला काहीही आक्षेप नाही’ असं अडोकिए हिनं म्हटलंय.

या वक्तव्यामुळे अडोकिए हिच्यावर टीकेचा मारा होतोय. अडोकिए हिनं यापूर्वीही अशी बेताल वक्तव्य केली आहेत. यापूर्वी आपल्या आईला प्रायव्हेट जेट भेट देणाऱ्यासोबत सेक्स करण्यास तयार असल्याचंही तिनं म्हटलं होतं.

बोको हरम या दहशतवादी संघटनेनं उत्तर नायजेरियातून 14 एप्रिल रोजी रात्री जवळपास 300 विद्यार्थिंनींचं अपहरण केलं होतं. अपहरणानंतर दो महिने उलटलेत तरीही सेना आणि सरकार त्यांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलंय. अशा गंभीर प्रकरणावर अडोकिए हिची बाष्कळ बडबड बऱ्याच जणांना रुचलेली नाही त्यामुळे त्यांनी फेसबुक आणि ट्विटरवर तिच्यावर टीकेचा भडिमार केलाय.

नायजेरियात इस्लामिक शासक लागू करण्यासाठी बोको हरम 2002 सालापासून सक्रीय आहे. 2009 सालापासून या संघटनेकडून होणाऱ्या हल्ले आणि हिंसाचारात दिवसेंदिवस वाढ झाल्याचंच दिसून आलंय. आत्तापर्यंत या संघटनेच्या हल्ल्यात हजारो जणांना आपला जीव गमवावा लागलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.