Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं खा आणि आरोग्यदायी राहा असा सल्ला डॉक्टर देतात. लांबच्या प्रवासातही बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी फळं नेली जातात. पण तुम्हाला माहित आहे का असं एक फळ आहे जे विमान प्रवासात तुम्ही बॅगेत ठेऊ शकतन नाही.

राजीव कासले | Updated: Jun 15, 2024, 09:02 PM IST
Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही? title=

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या भाज्या आणि फळे (Fruits) भरपूर खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. फळांमध्ये पौष्टिक सत्व असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी किंवा प्रवासात अनेक जण फळं घेऊन जातात. यामुळे पोटही भरतं आणि आरोग्यास हानीकारकही ठरत नाही. पण तुम्हाला माहित आहे का? असं एक फळ आहे जे तुम्ही विमानात (Air Travel) घेऊन जाऊ शकत नाही. असेच काही मजेशीर पण तितकेच विचार करायला लावणारे प्रश्न असतात ज्याची उत्तरं कदाचित आपल्याला माहित नसतात. अनेक परीक्षांमध्ये अशा प्रश्नांची उत्तरं माहित असणं आवश्यक असतं. 

स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान (General Knowledge) खूप गरजेचं आहे. आपण जितकं वाचन करु तितकीच भर आपल्या ज्ञानात पडते. म्हणूनच आम्ही काही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे प्रश्न जितके मजेशीर आहेत, तितकीच त्याची उत्तरंही माहितीपूर्ण आहेत. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत, त्याची उत्तरं तुम्हाला येतायत का याचा विचार करा. उत्तरं येत नसतील तर प्रश्नांची खाली उत्तरंही दिली आहेत (Questions And Answer). मग व्हा तयार  या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी.

प्रश्न 1 -  पाकिस्तानी लोकं कोणत्या देशात जाऊ शकत नाहीत?
उत्तर - पाकिस्तानी नागरिकांना इस्त्रायलमध्ये बंदी आहे.

प्रश्न 2 -  वांगी कलरचे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात?
उत्तर -  कॅनडा देशात वांगी कलरच्या टोमॅटोचं उत्पादन होतं. पण टोमॅटोची ही जात ब्रिटनमध्ये विकसीत करण्यात आली आहे.

प्रश्न 3 -  गुलाब कोणत्या देशाचं राष्ट्रीय फूल आहे?
उत्तर - गुलाब हे अमेरिकेचं राष्ट्रीय फुल आहे.

प्रश्न  4 -   जगातील कोणत्या देशात परमाणू हल्ला झाला होता.
उत्तर -  जपान देशावर परमाणू हल्ला करण्यात आला होता.

प्रश्न  5 - अकरोड फळ खाण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत?
उत्तर -  अकरोज खाल्याने हृद्याशी संबंधीत आजारांपासून दिलासा मिळतो.

प्रश्न  6 - माचिसचा शोध कोणत्या देशात लागला?
उत्तर - माचिसचा शोध ब्रिटन देशाने लावला

प्रश्न  7 - कोणतं फळ विमानात घेऊन जाऊ शकत नाही?
उत्तर - विमाना प्रवासात नारळ घेऊन जाण्यास बंदी आहे. बंदी असलेल्या वस्तूंमध्ये नुकताच नारळाचा समावेश करण्यात आला आहे.