नवी दिल्ली : इराकमध्ये बेपत्ता झालेल्या भारतीयांचा शोध सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली.
सर्व भारतीय सुखरुप असल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी केलाय. या संदर्भात या भारतीयांचा शोध सुरु असल्याचं स्वराज यांनी सांगितलंय.
सर्व देशांशी संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन या बेपत्ता भारतीयांचा शोध घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. इसिस दहशतवाद्यांच्या तावडीतून सुखरुप बचावलेला हरजीत सुरक्षित असल्याचा दावाही स्वराज यांनी केला आहे.
चाळीस भारतीय मजुरांपैकी ३९ जणांची हत्या केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीनं केला होता. मात्र स्वराज यांनी लोकसभा आणि राज्यसभेत हे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचा दावा केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.