उत्तर कोरियाकडून हायड्रोजन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी

उत्तर कोरियानं हायड्रोजन अणुबॉम्बची चाचणी घेऊन कृत्रिम भूकंप घडवून आणल्याचं स्पष्ट केलंय. या अणुबॉम्बच्या चाचणीमुळे निर्माण झालेल्या कंपनांची नोंद जगभरातल्या भूकंपमापकांवर झाली. त्यानंतर दक्षिण कोरिया, जपान आणि चीननं उत्तर कोरियानं अणु चाचणी केल्याचा दावा केला. त्याला आता अधिकृत दुजोरा मिळालाय.  

Updated: Jan 6, 2016, 09:44 AM IST
उत्तर कोरियाकडून हायड्रोजन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी title=

सेऊल : उत्तर कोरियानं हायड्रोजन अणुबॉम्बची चाचणी घेऊन कृत्रिम भूकंप घडवून आणल्याचं स्पष्ट केलंय. या अणुबॉम्बच्या चाचणीमुळे निर्माण झालेल्या कंपनांची नोंद जगभरातल्या भूकंपमापकांवर झाली. त्यानंतर दक्षिण कोरिया, जपान आणि चीननं उत्तर कोरियानं अणु चाचणी केल्याचा दावा केला. त्याला आता अधिकृत दुजोरा मिळालाय.  

हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वी केल्याचं उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित करण्यात आलंय. याआधी उत्तर कोरियानं तीन वेळा अणुचाचणी घेण्याचा प्रयत्न केल्यानं त्या देशावर जगातील सर्व प्रमुख राष्ट्रांनी निर्बंध घातले आहेत. 

पण स्वतःचं तंत्रज्ञान विकासित करण्याचा दावा करत उत्तर कोरियाचा हूकूमशाह किम जॉन उन स्वतःची अणुशस्त्र सज्जता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्या या प्रयत्नाला आज काहीस यश येताना दिसतंय. दरम्यान उत्तर कोरियानं केलेल्या आगळीकीनंतर साऱ्या जगातून त्या देशावर टीका होतेय.