नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'सेल्फी विथ डॉटर' हे कॅम्पेन सध्या बरंच गाजतंय. आजही हे कॅम्पेन चर्चेत आलंय... पण, ते नरेंद्र मोदींमुळे नाही तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यामुळे...
त्याचं झालं असं की, 'न्यूयॉर्क टाईम्स'नं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेल्या 'सेल्फी विथ डॉटर' कॅम्पेनविषयी एक बातमी टाकली होती. पण, इथंच झाली गफलत....
न्यूयॉर्क टाईम्सनं या बातमीसाठी जो फोटो वापरला तो होता काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग आणि त्यांची प्रेयसी पत्रकार अमृता सिंग यांचा.... तोही 'सेल्फी विथ डॉटर' या मथळ्याखाली.
Okay Diggy raja mistook #SelfieWithDaughter for selfie with daughter-aged GF.. ROFL pic.twitter.com/OPNk8spVTM
— Momee Borah (@RazorSharp_24) June 28, 2015
उल्लेखनीय म्हणजे, दिग्विजय आणि अमृता यांचा हा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लिक होऊन वायरल झाला होता... आणि त्यानंतर त्याची बरीच चर्चाही झाली होती.
न्यूयॉर्क टाईम्सच्या या पोस्टनंतर जेव्हा आपली चूक त्यांच्या ध्यानात आली तेव्हा त्यांनी तात्काळ हा फोटो हटवला... आणि आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.