www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकन खासदारांनी तालिबानला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच मार्गदर्शन करत असल्याचा दावा केला आहे. स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चेवरून खासदारांनी हा दावा केला आहे.
कॅलिफोर्नियाचे रिपब्लिकन खासदार डंकन हंटर यांनी नुकताच अफगिस्तानचा दौरा केला. अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्कर परतल्यावर पहिल्यांदाच त्यांनी अफगाणिस्तानचा दौरा केला. या दौऱ्याबद्दल ऑनलाइन बोलताना हंटर म्हणाले, की सध्याची परिस्थिती ही ९० च्या दशकासारखी नाही. तालिबान स्वतःहून दहशतवादाची दिशा ठरवत नाही.
याचाच अर्थ असा की अफगाणिस्तानात दहशतवादाचा धोका नसून त्याचं नियंत्रण अफगाणिस्तान बाहेर आहे. अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या सैन्य कमांडर्सनी त्यांना दिलेल्या माहितीमुसार पाकिस्तान आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय तालिबानला दहशतवादाबद्दल मार्गदर्शन करत आहे. अशा प्रकारे पाकिस्तानचं मार्गदर्शन चालू राहिलं तर, या देशाला कधीही स्थैर्य लाभणार नाही.