मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तान कोर्टानं लखवीला तुरुंगात स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

Updated: Dec 29, 2014, 12:52 PM IST
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी तुरुंगातून सुटणार title=

इस्लामाबाद: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रहमान लखवीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाकिस्तान कोर्टानं लखवीला तुरुंगात स्थानबद्द करण्याचा पाक सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

२६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला दोन आठवड्यांपूर्वी पाकमधील दहशतवादविरोधी कोर्टानं जामीन मंजूर केला होता. यावर चोहोबाजूंनी टीका झाल्यावर पाकिस्तान सरकारनं लखवीला तुरुंगातच स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. लखवीच्या वकिलांनी कारागृह प्रशासनास जामिनीचे आदेश दाखविण्यापूर्वीच प्रशासनानं त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश तुरुंग अधिक्षकांना सोपविले. त्यामुळं त्याची सुटका टळली होती.  सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली लखवीला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 

पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाला लखवीनं चार दिवसांपूर्वी इस्लामाबाद हायकोर्टात आव्हान दिलं. स्थानबद्ध करण्याच्या निर्णयात कायदेशीर प्रक्रियांचं पालन झालं नाही आणि स्थानबद्धतेसाठी जे कारण दिले आहेत ते देखील पुरेसे नाही, असा दावा लखवीच्या वकिलांनी हायकोर्टासमोर केला होता. सोमवारी हायकोर्टानं लखवीला दिलासा देत स्थानबद्ध करण्याचा निर्णय रद्द केला. लखवीच्या सुटकेविषयी भारतानं पाकिस्तानकडे निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.