मायकल जॅक्सनच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

सध्या ह्यात नसलेला जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सन याची मुलगी पॅरिस जॅकसन हिनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सध्या ह्यात नसलेला जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सन याची मुलगी पॅरिस जॅकसन हिनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. स्वयंपाकघरातील चाकूनं तिनं आपलं मनगट कापून घेतलं. एव्हढचं नाही तर याअगोदर तीनं एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.
बुधवारी लॉस एन्जेलिसमधील आपल्या राहत्या घरी १५ वर्षीय पॅरिसनं आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, यानंतर तातडीनं तिला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. त्यामुळे तिचा हा प्रयत्न फोल ठरला. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
‘१५ हे वयंच असं असतं... खूप हळवं... मग ते कुणीही असो’ अशी प्रतिक्रिया जॅकसन कुटुंबीयांचे वकील पॅरी सँन्डर्स यांनी दिलीय. ‘या वयात तीचे वडील तिच्या सोबत नसल्यानं तिच्यासाठी हा खूप कठिण काळ आहे... परंतू आता सध्या तिला योग्य मेडिकल ट्रीटमेंट मिळतेय. तुम्ही तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या खाजगी गोष्टींचा आदर राखा’ असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.
पॅरिसच्या हातावर कापण्याच्या एकापेक्षा जास्त खुणा आढळल्यात. तिनं ट्विटरवर तिच्या ‘फोलोअर्स’साठी त्या संध्याकाळी एक मॅसेजही ठेवला होता. यात ती म्हणते, ‘मला आश्चर्य वाटतंय की माझे अश्रू खारट आहेत’ असं तिनं एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर आणखी एका ट्विटमध्ये ती म्हणते, ‘काल मला असं वाटतं होतं की माझे सगळे प्रश्न माझ्यापासून आता लांब जातील पण आता वाटतंय की नाही ते मला सोडून न जाण्यासाठीच आहेत’.

‘तीन महिन्यांपूर्वी पॅरिसनं तिच्या आईशी संपर्क करून तिच्यासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी गळ घातली होती. डेबीही त्यासाठी तयार होती तसंच जॅकसनची आजी/सल्लागार असलेल्या कॅथरिन जॅकसननंही यासाठी होकार दिला होता’ असं पॅरिसच्या जवळच्या सूत्रांनी म्हटलंय.
पॅरिसच्या वडिलांचा म्हणजे मायकल जॅक्सन यांचा जून २००९ साली मृत्यू झालाय. तिला प्रिन्स आणि ब्लँकेट असे दोन भाऊदेखील आहेत. मायकल आणि डेबी १९९६ ते १९९९ पर्यंत विवाहबंधनात होते. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेऊन आपले मार्ग वेगवेगळे केले. यांची दोघांची दोन मुलं म्हणजे प्रिंस (१९९७) आणि पॅरिस (१९९८)... घटस्फोटानंतर रोवेला मुलांची कस्टडी मिळाली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.