www.24taas.com, लंडन
लंडनचे उद्योगपती आणि बिलिनिअर एलन मस्क मंगळावर एक छोटे शहर वसवण्याच्या तयारीत आहे. हे शहर छोटे असलेले तरी यात ८० हजार अंतराळ यात्री राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त शाकाहारी व्यक्तींना या शहरात येण्याचे आमंत्रण देण्यात येणार आहे.
मस्क यांचे फाल्कन ९ हे रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नासासाठी समान पाठवतात. मस्क यांच्यामते, मंगळावरील या स्वप्नातील शहरात अशी संस्कृती निर्माण व्हावी, की जी एक दुसऱ्यांशी आधारीत आहे.
रॉयल एरोनॉटिक सोसासटीसमोर दिलेल्या भाषणात मस्क यांनी आपल्या स्वप्नातील गावाचे नियोजन बोलून दाखवले. या स्वप्नातील शहरासाठी मी १० वर्षांपासून वाट पाहत होतो. दहा वर्षांपूर्वी असे काहीही सांगणे सोपे नव्हते. तेव्हा माझ्याकडे कोणतेही रॉकेट नव्हते, तसेच या संदर्भातील मूलभूत सेवासुविधा नव्हत्या. तसेच या संदर्भात काम करणारी नासा ही एकमेव संस्था होती आणि तिचाही मंगळावर जाण्याचा कोणताही प्लान नव्हता.
पण आता माझ्यासह इतर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नाने हे स्वप्नातील शहर मंगळावर स्थापन करणे शक्य होणारह आहे. मंगळावर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर जिवंत राहणारी संस्कृती निर्माण करू शकतात. तसेच या संस्कृतीला खूप मोठे करू शकतात.
मंगळावर शहर वसवण्याचा हा मस्क यांचा हा पहिला प्रयत्न नाही. यापूर्वी मंगळावर सामानांची ने-आण करण्यासाठी कार्गो ट्रान्सपोर्ट रॉकेट पाठविण्याची योजना मस्क यांनी मांडली होती. हे रॉकेट लिक्विड ऑक्सिजन आणि मिथेनच्या साहय्याने चालणार आणि प्रवाशांना मंगळावर घेऊन जाणार अशी ही व्यवस्था त्यांनी बोलून दाखवली. मंगळावरील या सफरीसाठी सुमारे ३ लाख पौंडचा खर्च प्रत्येक व्यक्तीला करावा लागणार आहे.