फिलिपाईन्सची पिया अलोन्झो मिस युनिव्हर्स

यंदाच्या वर्षीचा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलाय फिलिपाईन्सच्या पिया अलोन्झो हिने. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये झालेल्या ६४व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने बाजी मारली. 

Updated: Dec 21, 2015, 09:34 PM IST
फिलिपाईन्सची पिया अलोन्झो मिस युनिव्हर्स title=

लॉस वेगास : यंदाच्या वर्षीचा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलाय फिलिपाईन्सच्या पिया अलोन्झो हिने. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये झालेल्या ६४व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने बाजी मारली. 

अखेरच्या राऊंडमध्ये अमेरिका, फिलिपाईन्स आणि कोलंबियाच्या तीन सौंदर्यवती पोहोचल्या होत्या. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उर्वशी रौतेला हिला टॉप १५ मध्येही स्थान मिळवण्यात अपयश आले. 

मिस कोंलंबियाची अॅड्रियाना गुट्रेझ पहिली रनर अप आणि मिस यूएस ऑलिव्हिया जॉर्डन दुसरी रनर अप ठरली. ८० देशांच्या सौंदर्यवतींनी यात सहभाग घेतला होता.

सोहळ्यात विजेत्या सौंदर्यवतीच्या नावाची घोषणा करताना चांगलाचा गोंधळ झाला. सूत्रसंचालिका स्टीव्ह हार्वे यांनी मिस कोलंबिया अॅड्रियाना गुट्रेझ मिस युनिव्हर्स असल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर आपण चुकीच्या नावाची घोषणा केल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपली चूक मान्य करत पिया अलोन्झोचे मिस युनिवर्स म्हणून नाव घोषित केले.