'माझी पत्नी सोडून गेली तर विमान क्रॅश करेल'

तुम्ही विमानात बसला आहात, विमान अगदी आकाशात झेपलं गेलं आहे आणि तेव्हा पायलट म्हटला की, मी विमान क्रॅश करुन टाकेल तर...? घाबरून जाल ना... पण अशी घटना घडली आहे.

Updated: Mar 7, 2016, 07:04 PM IST
'माझी पत्नी सोडून गेली तर विमान क्रॅश करेल' title=

मुंबई : तुम्ही विमानात बसला आहात, विमान अगदी आकाशात झेपलं गेलं आहे आणि तेव्हा पायलट म्हटला की, मी विमान क्रॅश करुन टाकेल तर...? घाबरून जाल ना... पण अशी घटना घडली आहे.

एका इटालियन पायलटने असं काही म्हटलं की विमानातील 200 प्रवाशांमध्ये खळबळच उडाली असेल. या पायलटच्या पत्नीने त्याला मॅसेच केला ती आत्महत्या करतेय... हा मॅसेज आलानंतर पायलटने म्हटलं की, 'जर माझी पत्नी मला सोडून गेली तर मी हे विमान क्रॅश करुन टाकेल.' 

मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती. पण दुसऱ्या पायलटने परिस्थिती सांभाळली आणि प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेच्या 2 महिने आधीच एका जर्मन पायलटने एक विमान क्रॅश केलं होतं ज्यामध्ये १४९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.