गोवा : दहशतवादविरोधी लढ्यात देऊ केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझिलचे आभार मानलेत. गोव्यामध्ये झालेल्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्राझिलचे अध्यक्ष मायकल टेमर यांच्याशी मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वाला दिलेल्या पाठिंब्यासाठीही मोदींनी टेमर यांचे आभार मानले. यावेळी प्रामुख्यानं कृषी आणि कृषीसंलग्न उद्योगांमध्ये चार वेगवेगळे करार दोन्ही देशांमध्ये झाले.