70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका

बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर... 

Updated: Sep 28, 2015, 11:39 AM IST
70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका title=

सॅप सेंटर, कॅलिफोर्निया: बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर... 

माझ्यावर एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही, मोदींची सॅप सेंटरमध्ये गर्जना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. भारतीय राजकारणावर भाष्य करत त्यांनी भ्रष्टाचारावर टीका केली. कोणत्याही पक्षाचं नाव न घेता त्यांनी काँग्रेसवर आरोप केलेत.

आणखी वाचा - फेसबुक प्रमुखाने घेतलेल्या मुलाखतीत मोदी रडले

पंतप्रधानांची JAM संकल्पना
मोदी यांनी JAM ही संकल्पना मांडली.   
J - जनधन योजना
A - आधार कार्ड
M - मोबाईल गव्हर्नन्स या तिन्हींच्या मदतीनं भारत प्रगती पथावर जातोय.

दहशतवादावर सडकून टीका
पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादावर टीका केली. दहशतवाद हा दहशतवादच असतो तो चांगला किंवा वाईट नसतो, असं ते म्हणाले. दहशतवादामुळं मानवतेचं रक्षण होऊ शकत नाही. यूएननं 70 वर्ष झाले पण दहशतवादाची व्याख्या निश्चित केली नाहीय, या शब्दात त्यांनी यूएननं याबाबत लवकर निर्णय घ्यावा असं सांगितलं. तर पाकिस्तानचं नाव न घेता दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांवर टीका केली. 

गुड मॉर्निंग कॅलिफोर्निया
मोदी स्टेजवर येताच उत्साहित भारतीयांनी त्यांचं स्वागत केलं. मोदींनीही गुड मॉर्निंग कॅलिफोर्निया म्हणून त्यांचं स्वागत स्वीकारलं. आज भगत सिंह यांचा जन्मदिवस आहे याची आठवण त्यांनी अनिवासी भारतीयांना करून दिला आणि भगत सिंह अमर रहे!च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला.

पंतप्रधान सॅप सेंटरला पोहोचण्यापूर्वी गायक कैलाश खेर यांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं. 

पंतप्रधानांच्या भाषणातील काही मुद्दे- 

  • LIVE- कॅलिफोर्नियाच्या सॅप सेंटरमधून पंतप्रधानांचं लाईव्ह भाषण
  • पहिल्याच प्रयत्नात मार्स मिशन यशस्वी करणारा देश भारत
  • सर्वात वेगवान आर्थिक प्रगती होणारा कोणता देश असले, तर तो भारत आहे 
  • पहिले उपनिषदांची चर्चा करणारा भारत देश आता उपग्रहांची चर्चा करतोय
  • भारतात सध्या तरुणांची फौज आहे, त्यामुळं देश काहीही करु शकतो आणि भारत करुन दाखवेल
  • जनधन योजनेबद्दल मोदींनी दिली माहिती
  • JAM
  • J - जनधन योजना
  • A - आधार कार्ड
  • M - मोबाईल गव्हर्नन्स
  • दहशतावादावर पंतप्रधानांची टीका, यूनला दहशतवादाची व्याख्येबद्दल लवकर निर्णय घेण्याची मागणी
  • मानवतेवर विश्वास ठेवल्यास दहशतवाद, ग्लोबल वॉर्मिंगवर मात करणं शक्य
  • कॅलिफोर्नियाच्या सॅप सेंटरमध्ये 'भारत माता की जय'चा जयघोष
  • 2 डिसेंबर 2015 दिल्लीपासून सॅन फ्रान्सिस्को एअर इंडियाचं थेट फ्लाइट, आठवड्यातून तीन दिवस चालणार, पंतप्रधानांची घोषणा

आणखी वाचा - फेसबुक प्रमुखाचा भारताला 'डिजिटल सलाम'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.