सुप्रसिद्ध कव्वाल अमजद साबरीची कराचीत गोळी घालून हत्या

 कव्वाली गायनात सुप्रसिद्ध जोडी असलेल्या साबरी ब्रदर्सपैकी अमजद  साबरी यांची कराचीत गोळी मारून हत्या करण्यात आली. 

Updated: Jun 22, 2016, 06:01 PM IST
सुप्रसिद्ध कव्वाल अमजद साबरीची कराचीत गोळी घालून हत्या  title=

कराची :  कव्वाली गायनात सुप्रसिद्ध जोडी असलेल्या साबरी ब्रदर्सपैकी अमजद  साबरी यांची कराचीत गोळी मारून हत्या करण्यात आली. 

आज दुपारी कराचीतील लियाकतबाद भागात काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी  त्यांच्या कारवर अंदाधुंद गोळ्या चालविल्या. त्यानंतर त्यांना गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी त्याने अंतीम श्वास घेतला. 

साबरी बंधूंनी १९७० च्या दशकात कव्वालीला पाश्चिमात्य देशात खूप प्रसिद्ध केली. या कव्वाली ग्रुपची सुरूवात दिवंगत गुलाम फरीद साबरी आणि त्यांचे छोटे भाऊन हाजी मकबूल अहमद साबरी यांनी केली होती. अमजद साबरी हे गुलाम साबरी यांचे सुपुत्र आहे.