मोठा खुलासा : तर यामुळे बुडाली होती टायटनिक बोट

रिसर्च करणाऱ्या संशोधकांनी काढला निष्कर्ष

Updated: Jan 2, 2017, 01:44 PM IST
मोठा खुलासा : तर यामुळे बुडाली होती टायटनिक बोट title=

नवी दिल्ली : टायटनिक हा सिनेमा अनेकांनी आतापर्यंत पाहिला आहे आणि अनेकांच्या आजही तो स्मरणात आहे. प्रसिद्ध असलेली टायटनिक बोट समुद्रतील हिमनगाला ठोकल्यामुळे त्याला नुकसान पोहोचलं आणि ती बुडाली असं सिनेमामध्ये दाखवण्यात आलं होतं. पण यावर रिसर्च करणाऱ्या संशोधकांनी एक वेगळा निष्कर्ष काढला आहे.

रिसर्च करणाऱ्या संशोधकांनी कदाचित टायटनिकमध्ये आधी आग लागली होती. त्यामुळे ती कमजोर झाली. टायटनिक बनवणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष जे. ब्रूसने म्हटलं आहे की, जहाजवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आगीबाबत जहाजातील प्रवाशांना काही सांगू नये.

एप्रिल १९१२ मध्ये न्यूयॉर्कसाठी निघालेल्या टायटनिकला अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली होती. यामध्ये १५०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता. 

संशोधकांच्या मते ही आग तीन आठवड्यापर्यंत होती. यावर कोणी लक्ष दिलं नाही. या आगीमुळे जहाजाला नुकसान पोहोचलं त्यानंतर ते हिमनगाला ठोकल्यामुळे तो अजून कमजोर होऊन बुडालं. आग लागण्याचं निष्कर्ष हे जहाजात दिसलेल्या ३० फूट उंचीच्या काळ्या डागावरुन काढण्यात आला.

जहाजाच्या मागच्या बाजुला हे काळे डाग दिसले ज्या बाजुला जहाज हिमनगाला ठोकलं होतं. ही आग बॉयलर रूमच्या मागे असलेल्या इंधनाच्या स्टोरला लागली असावी अशी शक्यता आहे. १२ लोकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण ती आटोक्यात आली नाही. त्यामुळे तापमान 1,000 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचलं.