www.24taas.com,वॉशिंग्टन
निवडणूक म्हंटली की वाद, आरोप-प्रत्यारोप आलेच. अमेरिकेत निवडणुकीपूर्वी जाहीर वाद घेण्याची पद्धत आहे. मात्र, वादाची ही फेरी अनिर्णीत राहिली. परंतु बराक ओबामांवर बाजी मारली ती मीट रॉम्नी
ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मिट रॉम्नी यांच्यातील या वादाकडे अमेरिकेचेच नव्हे , तर जगाचेही लक्ष लागलेले होते. अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मीट रॉम्नी यांच्यातल्या जाहीर वादाची पहिली फेरी बुधवारी डेनव्हर विद्यापीठात पार पडली.
यात मंदीच्या गर्तेत सापडलेली अमेरिकी अर्थव्यवस्था, करसवलती, रोडावत चाललेले रोजगार, परराष्ट्र धोरण अशा विविध विषयांवर दोन्ही उमेदवारांनी मते मांडली.
मंदीच्या गर्तेत सापडलेली अमेरिकी अर्थव्यवस्था, करसवलती, रोडावत चाललेले रोजगार, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठीची योजना, परराष्ट्र धोरण आदी विविध मुद्यांवर दोन्ही उमेदवारांनी मते मांडली. परस्परांचे काही मुद्दे खोडले.
वादाची ही फेरी अनिर्णीत राहिली असली, तरी वादावर रॉम्नी यांचे वर्चस्व होते. त्यांनी अनेकदा ओबामांना अडचणीत आणले. ओबमांनी रॉम्नींचे काही मुद्दे , विशेषतः आर्थिक विषयांवरील, खोडून काढले. अडचणीत असलेल्या उद्योगांना करसवलती देण्यावरून, आरोग्य योजनेवरून आणि आर्थिक सुधारणांबाबत अमेरिकेत वाद सुरू आहे.
अर्थव्यवस्था वाढीबाबत रॉम्नींनी भाष्य करताच ओबामांनी त्यांच्याकडे पर्यायी योजनेचीच मागणी केली. कर कमी करण्याचा मुद्दा रॉम्नींनी मांडला होता. मात्र, त्यामुळे लोकांच्या अडचणींत वाढ होईल, असे नमूद करीत ओबामांनी तो खोडून काढला.
ओबामांची आरोग्य योजनाही वादाच्या भोवऱ्यात आहे. चीनकडून कर्ज काढण्याइतपत ही योजना महत्त्वाची आहे का, असा सवाल रॉम्नींनी केला. ओबामांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीतील दोष दाखवत त्यांनी हल्ला चढविला. मात्र, याच चार वर्षांतील कामगिरीचा दाखला देत ओबामांनी आपल्याला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन अमेरिकी मतदारांनी केले.
वादाची ही फेरी अनिर्णीत राहिली असली तरी वादावर रॉम्नी यांचं वर्चस्व राहिलं. या दोघांमध्ये रंगलेला हा वाद अभ्यासपूर्ण, संयमी आणि परस्परांबद्दल आदर दाखवणारा होता.