www.24taas.com, झी मीडिया, मॉस्को
पुरुषी मानसिकतेचा हीन आणि धक्कादायक प्रकार रशियाच्या कनिष्ठ सभागृहात पाहायला मिळाला. रशियाच्या कनिष्ठ सभागृहाचे डेप्युटी स्पीकर ब्लादिमीर जिरिनोवोस्की यांनी भर पत्रकार परिषदेतच एका महिलेला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश देऊन टाकला.
एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, एका महिला पत्रकारानं जिरिनोवोस्की यांनी यूक्रेन संदर्भात त्यांना न रुचणारा असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी हे महोदय चांगलेच भडकले आणि त्यांनी `या महिलेवर बलात्कार करा` असं म्हणत आपल्या समर्थकांना या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश देऊन टाकला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ही महिला पत्रकार गर्भवती आहे.
जिरिनोवोस्की या प्रश्नावर चांगलेच तापले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत गर्भवती महिला पत्रकाराशी गैरवर्तन केलं. `जर तू गर्भवती आहेस तर तुझी या पत्रकार परिषदेत काही एक गरज नाही` असं म्हणत त्यांनी आपल्या समर्थकांना या महिलेवर बलात्कार करण्याचे आदेश दिले.
धक्कादायक म्हणजे ब्लादिमीर यांचा हा आदेश मिळाल्यानंतर ताबडतोब त्यांचे समर्थक या महिला पत्रकार स्टेला दुबोवित्सकाया यांच्याकडे वळले. त्यामुळे ही महिला पत्रकार घाबरली. त्यामुळे, तिची प्रकृती बिघडली आणि तिला चांगलाच मानसिक धक्काही बसला. त्यानंर स्टेला हिला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं.
ब्लादिमीर यांच्या या आदेशावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.