सौदी अरेबियात दोन आत्मघातकी स्फोट

मदिना आणि कातिफ या शहरात दोन आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आलेत. सौदी अरेबियात पैगंबर मोहम्मद मशिदीसमोर हे स्फोट झालेत.

Reuters | Updated: Jul 4, 2016, 11:46 PM IST
सौदी अरेबियात दोन आत्मघातकी स्फोट title=

सौदी अरेबिया : मदिना आणि कातिफ या शहरात दोन आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आलेत. सौदी अरेबियात पैगंबर मोहम्मद मशिदीसमोर हे स्फोट झालेत.

मदिना हे मक्कानंतर इस्लाममधील दुसरे मोठे पवित्र शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अल्पसंख्याक शिया मुसलमान याची वस्ती आहे. या वस्तीला तसेच शिया मशिदीला टार्गेट करण्यात आलेय.

कातिफ आणि मदिना येथे मशिदीसमोर कण्यात आलेले बॉम्बस्फोट हे इसिस या दहशतवादी संघटने घडवून आणल्याचे म्हटले जात आहे. रमजान आणि ईद अल फितर या सणाच्या पार्श्वभूमीवर हे स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. या स्फोटाचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.