अमेरिकेत गोळीबारांचं सत्र सुरूच; ३ जण ठार

काही दिवसांपूर्वीच झालेल्या गोळीबारानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेत गोळीबार झालाय. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 31, 2012, 07:43 PM IST

www.24taas.com, न्यू जर्सी, अमेरिका
काही दिवसांपूर्वीच झालेल्या गोळीबारानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेत गोळीबार झालाय. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेतल्या न्यू जर्सी भागातील सुपरमॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात हल्लेखोरासहित तीन जण ठार झालेत. अमेरिकेत गेल्या काही दिवसांतील हिंसेच्या वाढत्या घटनांमुळे देशात दहशतवादाचं सावट पसरलंय. ऑगस्ट महिन्यापासून अमेरिकेतील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
काही दिवसांपूर्वी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी अमेरिकेतलं सर्वात मोठं शहर म्हणून ओळख असलेल्या न्यू यॉर्क शहरातल्या एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये दोन जणांना प्राणाला मुकावं लागलं होतं. या हल्ल्यातही हल्लेखोर ठार झाला होता. त्याआधी ५ ऑगस्ट रोजी अमेरिकेतल्या विसकॉन्सिन भागातील एका गुरुद्वारामध्ये घुसून हल्लेखोरांनी बेधुंद गोळीबार केला होता. यामध्ये ७ जण ठार झाले होते तर २० जण जखमी झाले होते.