ताईपे: ट्रान्स एशिया एअरलाईन्सचे विमान तैवानमधील ताईप इथं किलुंग नदीत कोसळून झालेल्या अपघातात २३ जण ठार झाल्याचं वृत्त आहे. एकूण ५८ प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान आज एका पुलाला धडकलं आणि नदीत कोसळलं.
अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांच्या मदतीसाठी बचाव कार्य सुरू असून आत्तापर्यंत १० जणांना वाचवण्यात यश मिळालं असलं तरी या अपघातात २ जण ठार झाले आहेत.
तैवानची राजधानी तैपेईमध्ये ट्रान्सएशियाच्या ATR ७२-६०० विमानाला अपघात झाला.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात ट्रान्सएशियाच्या ATR ७२ या विमानाला अपघात झाला होता. त्यात ४८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १० जण जखमी झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.