वर्जीनिया : वर्जीनियातील वुडसाइड स्कूलमध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अश्लिल फोटो दाखविल्याबद्दल तिला अटक करण्यात आली आहे. ३४ वर्षीय मेलिसा किड हिला या प्रकरणानंतर निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर शिक्षिकेने स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिला आहे.
या शिक्षिकेने वर्गात तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांनना आपल्या आयफोनमधील आपले काही अश्लील फोटो दाखविले. या फोटोत त्या शिक्षिकेने काहीच वस्त्र परिधान केले नव्हते. तीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचे १८ आणि एकाचे १६ वय आहे. एका विद्यार्थ्याने याची तक्रार केल्यानंतर मेलिसा हिला अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.