GK Quiz : 1913 मध्ये 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतातील हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर बोलपट सिनेमा 1931 मध्ये प्रसिद्ध झाला आणि या चित्रपटाचं नाव होतं 'आलम आरा'. हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तयार झाला होता. मूकपट आणि बोलपट चित्रपटानंतर तो काळ आला, जेव्हा भारताचा पहिला रंगीत चित्रपट तयार झाला. तुम्हाला माहिती आहे का भारताचा पहिला रंगीत चित्रपट कोणता होता? हे आणि असे अनेक प्रश्न स्पर्धात्मक परीक्षेत विचारले जातात.
यामुळेच आज आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. ज्यात विविध विषयांवरचे प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर अचूक आहे की नाही यासाठी प्रश्नाच्या खाली उत्तरही देण्यात आलं आहे. परीक्षा असो किंवा नोकरीसाठी मुलाखती असो हे प्रश्न तुमचं सामान्य ज्ञान आणखी मजबूत करणारे ठरतील.
प्रश्न - मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर - मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव त्वचा आहे.
प्रश्न - कोणतं फळांच्या बिया खाल्ल्याने मांजरीचा मृत्यू होण्याची भीती असते?
उत्तर - पपईच्या बिया खाल्याने मांजरीचा मृत्यू होऊ शकतो.
प्रश्न - भारत-पाक सीमा रेषेला काय म्हणतात?
उत्तर - भारत पीक सीमा रेषेला रेडक्लिफ लाईन म्हटलं जातं
प्रश्न - भारताची आयर्न लेडी म्हणून कोणाला ओळखले जातं?
उत्तर - भारताची आयर्न लेडी म्हणून इंदिरा गांधी यांना ओळखलं जातं.
प्रश्न - सापावर काय टाकल्यास तो पळून जातो?
उत्तर - सापावर रॉकेल शिंपडल्यास तो तात्काळ पळून जातो.
प्रश्न - जगातील कोणत्या देशात रात्र होत नाही?
उत्तर - जगात असा एक देश आहे, जिथे जवळपास तब्बल अडीच महिन्यांनी रात्र होते. या देशाचं नाव नॉर्वे असून इथं 24 तास सूर्य चमकत असतो. आता तुम्ही विचार करत असाल या देशात दिवस आणि रात्रीची वेळ कशी ठरवली जाते. वास्तविक या देशात जवळपास अडीच महिने दिवस असतो. त्यामुळे आपल्या सोयीनुसार इथली लोकं झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करतात. एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान नॉर्वेत रात्र होत नाही. यामुळेच नॉर्वेला 'लँड ऑफ द मिडनाईट सन' असं म्हटलं जातं. याशिवाय फिनलँड, कॅनाडा आणि अलास्का देशातही दिवस जास्त असतात.
प्रश्न - तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?
उत्तर - 1937 मध्ये मोती जी. गिडवाणी यांनी एक सिनेमा प्रदर्शित केला, या सिनेमाचं नाव होतं, 'किसान कन्या'. या सिनेमामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला रंग मिळाले. या चित्रपटाने पहिला कलर सिनेमाचा मान मिळवत इतिहास रचला.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.