गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट; कोस्ट गार्डच्या पाठलागानंतर स्फोट

नुकतीच गुजरातच्या पोरबंदरमध्ये पाकिस्तानी बोट आढळून आलीय. धक्कादायक म्हणजे, कोस्ट गार्डनं या बोटींचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून आत्मघात केलाय. 

Updated: Jan 2, 2015, 05:07 PM IST
गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट; कोस्ट गार्डच्या पाठलागानंतर स्फोट  title=

नवी दिल्ली : नुकतीच गुजरातच्या पोरबंदरमध्ये पाकिस्तानी बोट आढळून आलीय. धक्कादायक म्हणजे, कोस्ट गार्डनं या बोटींचा पाठलाग केल्यानंतर या बोटीवर स्वार असलेल्या संशयितांनी स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून आत्मघात केलाय. 

गुप्तचर संस्थेच्या अहवालात हा खुलासा करण्यात आलाय. ही पाकिस्तानी बोट गेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१४ रोजी आढळून आली  होती. या बोटीवर चार जण स्वार होते, अशी माहिती समजतेय. पोरबंदरच्या किनाऱ्यापासून ३६५ किलोमीटर दूरवर ही बोट भारतीय कोस्ट गार्डला आढळून आली होती. 

पाकिस्तानी बोट असल्याचं लक्षात आल्यानंतर कोस्ट गार्डनं या बोटीला  चेतावणी दिली... परंतु, या बोटीवर उपस्थित असलेल्या संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. कोस्ट गार्डनं जवळपास एक तासापर्यंत त्यांचा पाठलाग केला...

पण,  या बोटीतल्या संशयित दहशतवाद्यांनी बोटीमध्येच स्वत:ला स्फोटकांच्या साहाय्यानं उडवून दिलं. सुरक्षा रक्षकांच्या म्हणण्यानुसार, या बोटीत स्फोटकं वाहून आणले जात होते. ही बोट कराचीहून गुजरातमद्ये दाखल होत होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.