लग्न मंडपावरच रॉकेट कोसळल्याने २० जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानात एका लग्नसोहळ्यावर काळाने घाला घातला. लग्न मंडपावरच एक रॉकेट कोसलळ्याने २० जणांचा मृत्यू झालाय. तर ४०हून अधीकजण जखमी झालेत. जखमी आणि मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

ANI | Updated: Jan 2, 2015, 10:53 AM IST
लग्न मंडपावरच रॉकेट कोसळल्याने २० जणांचा मृत्यू  title=

काबूल : अफगाणिस्तानात एका लग्नसोहळ्यावर काळाने घाला घातला. लग्न मंडपावरच एक रॉकेट कोसलळ्याने २० जणांचा मृत्यू झालाय. तर ४०हून अधीकजण जखमी झालेत. जखमी आणि मृतांमध्ये बहुतेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

अफगाणिस्तानात एका लग्न मंडपावरच एक रॉकेट कोसळल्याने हाहाकार उडाला. हेलमंद प्रांतात ही दुर्दैवी घटना घडली. ज्या घरात विवाहाची धापळ सुरु होती. त्याचवेळी एक रॉकेट कोसळलं.

दरम्यान, सुदैवानने अनेक जण घराबाहेर पडले होते त्यावेळीच हे रॉकेट कोसळल्याने मोठी जीवित हानी टळली.

या घटनेच्यावेळी अफगाणिस्तान सैनिक आणि तालिबानी यांच्यात युद्ध सुरु होते. अफगाणिस्तानात अमेरिका आणि नाटो सेनेच्या युद्धाचा हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे युद्धाचा फटका विवाहसोहळ्याला बसल्याचे म्हटले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.