ट्युनिशियात अतिरेकी ह्ल्ल्यात २७ तर कुवेतमध्ये १३ ठार

आफ्रिकेच्या टोकाशी असणाऱ्या ट्युनिशिया या देशात सॉसी येथील पर्यटन स्थळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जण ठार आलेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी फ्रान्स, कुवेत या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.  

Reuters | Updated: Jun 26, 2015, 10:37 PM IST
ट्युनिशियात अतिरेकी ह्ल्ल्यात २७ तर कुवेतमध्ये १३ ठार title=

सॉसी : आफ्रिकेच्या टोकाशी असणाऱ्या ट्युनिशिया या देशात सॉसी येथील पर्यटन स्थळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जण ठार आलेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी फ्रान्स, कुवेत या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.  

ट्युनिशियामध्ये सॉसी येथे एका समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टवर हल्ला झाला. रिसॉर्टमध्ये आलेल्या एका बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार करुन २७ जणांची हत्या केली. सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला.

तर फ्रान्समधील लिओन शहरापासून ४० किमी. अंतरावर असलेल्या गॅस फॅक्टरीत यासिन सल्ही (३५) नावाच्या हल्लेखोराने घातपाताचा प्रयत्न केला. कारमधून वेगाने फॅक्टरीत आलेल्या यासिनने एका व्यक्तीचा गळा चिरुन हत्या केली. तर दोन जणांना जखमी केले. , स्फोट घडविण्याचा त्याचा डाव फसला. पोलिसांनी यासिनला अटक केली. त्याची चौकशी सुरु आहे.

तिसऱ्या घटनेत कुवेत सिटी येथे अल-ईमाम-अल-सादिक शिया मशिदीत नमाज पढत असलेल्या भाविकांना लक्ष्य करुन आत्मघाती हल्ला करण्यात आला. मशिदीत आलेल्या दहशतवाद्याने स्वतःभोवती गुंडाळून घेतलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. या हल्ल्यात १३ जण ठार आणि २५ जण जखमी झाले. मशिदीच्या इमारतीचे नुकसान झाले. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.