४५ कोटी वर्षां पूर्वीच्या सागरी जीवाश्माचा शोध!

ब्रिटनमधील युनिवर्सिटी ऑफ लिसेस्टरच्या भूस्तरशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड सिवेटर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांना जीवश्म असलेली आकृती सापडली आहे.

Updated: Mar 18, 2014, 01:18 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, लंडन
ब्रिटनमधील युनिवर्सिटी ऑफ लिसेस्टरच्या भूस्तरशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड सिवेटर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांना जीवश्म असलेली आकृती सापडली आहे. ही आकृती शास्त्रज्ञांना समुद्रातून मिळालीय. जीवाश्म ४५ कोटी वर्ष पूर्वीचा असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
`नर्सरी इन द सी च्या शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रजातीचं जीवाश्म शोधलंय. जे आपल्या अंड्याचं संरक्षण करतं. अतिशय दुर्मिळ आणि आश्चर्यकारक गोष्ट जीवाश्मात आढळली आहे असं, सिवेटर यांनी म्हटलंय.
जसे जमिनीवरील मानव प्रजाती स्व:ताच्या मुलांची काळजी घेतात तशीच काळजी सागरी जीवाश्मसुद्धा घेतात, असं संशोधनातून सिद्ध झालंय. नवीन जीवाश्मला `ल्युप्रिस्का इंक्यूबा` हे नाव देण्यात आलंय.
प्रजनन आणि बाल संगोपन यांची क्रिया किमान ४५ कोटी वर्ष जुनी असल्याचं संशोधनातून उघड झालंय. जीवाश्ममध्ये सर्वात जुने `ओस्ट्राकोड` सापडलेत.
`ओस्ट्राकोड समुद्राच्या किनारी राहून आणि शिकार करुन अन्न मिळविण्यात सक्षम आहेत, असंही जर्नल जीवशास्त्रमधील प्रकाशित केलेल्या अहवालात सिवेटर यांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.