जगातला सर्वात उंच व्यक्ती प्रेयसीसोबत विवाहबद्ध!

जगातील सर्वात उंच माणूस विवाहाच्या बंधनात अडकलाय. गिनीज बुकमध्ये सर्वात उंच माणूस असा रेकॉर्ड असलेला तुर्कीस्तानचा सुल्तान कोसेन यानं आपली प्रेयसी मेरवे डीबो हिच्याशी लग्न केलंय. ३० वर्षाच्या सुल्तानची उंटी ८ फूट ३ इंच असून २० वर्षाची मेरवेची उंची अवघी ५ फूट ८ इंच आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 29, 2013, 01:13 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
जगातील सर्वात उंच माणूस विवाहाच्या बंधनात अडकलाय. गिनीज बुकमध्ये सर्वात उंच माणूस असा रेकॉर्ड असलेला तुर्कीस्तानचा सुल्तान कोसेन यानं आपली प्रेयसी मेरवे डीबो हिच्याशी लग्न केलंय. ३० वर्षाच्या सुल्तानची उंटी ८ फूट ३ इंच असून २० वर्षाची मेरवेची उंची अवघी ५ फूट ८ इंच आहे.
३० वर्षीय सुल्तान कोसेन अनेक दिवसांपासून जोडीदाराच्या शोधात होता. पण मला माझ्या उंचीची कोणती मुलगी मिळत नव्हती. मात्र मेरवे माझ्या आयुष्यात येणं म्हणजे एक प्रकारचा चमत्कार झाला. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, असं कोसेन म्हणाला.
सुल्तानच्या हातांची लांबी २७.५ सेंटीमीटर आहे तर पायांची लांबी ३६.५ सेंटीमीटर आहे. त्यांना २८ नंबरचे जोडे लागतात. व्यवसायानं शेतकरी असलेल्या सुल्तान एका अशा आजारानं ग्रस्त आहे की, ज्यामुळं शरीराची उंची वाढतच जाते. आठ फूट पेक्षा जास्त उंची असलेले सुल्तान या दशकातले पहिले व्यक्ती आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.