वेलिंग्टन : झोपेत चालणाऱ्या व्यक्तींबद्ल तुम्ही अनेकदा ऐकले, वाचले असेल, मात्र झोपेत कोणी पियानो वाजवत असेल हे कधी ऐकले नसले. न्यूझीलंडमध्ये अशी एक मुलगी आहे जी झोपेत पियानो वाजवते.
इसाबेला असे या मुलीचे नाव आहे आणि ती १२ वर्षांची आहे. इसाबेलाच्या एका नातेवाईकाने तिचा झोपेत पियानो वाजवण्याचा व्हिडीओ बनवलाय. ज्यात ती झोपेत घोरतेय त्यासोबतच तिचा दुसरा हात पियानोवर फिरत होता. इसाबेलाला झोपेत चालण्याची सवय होती आणि याआधीही ती झोपेत चालत असे मात्र पियानो वाजवत नव्हती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इसाबेला पियानो वाजवायला येत नाही आणि तिने याचे प्रशिक्षणही घेतलेले नाही. जेव्हा ती झोपेतून जागी होते तेव्हा तिला हे सर्व काही आठवत नाही आणि तिला पियानोही वाजवता येत नाही.