कझखस्तान: पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपी काय करू शकतील याचा नेम नाही. कझखस्तानच्या अलमाटीमध्येही अशी एक धक्कादायक घटना घडली आहे. अलमाटीच्या एका दुकानामध्ये महिला सिगरेट ओढत होती.
सिगरेट ओढणं हे कझखस्तानमध्ये बेकायदेशीर असल्यामुळे या दुकानातल्या सुरक्षा रक्षकानं तिला हटकलं आणि दुकानातून बाहेर जायला सांगितलं. बाहेर जायला महिलेनं नकार दिल्यानं सुरक्षा रक्षकानं तिला उचललं आणि बाहेर काढलं.
पण थोडावेळानंतर ही महिला पुन्हा दुकानात आली आणि तिनं स्वत:चे कपडे उतरवायला सुरुवात केली. आता मला हात लावलास तर तुला कोर्टातच भेटेन अशी धमकीही तिनं सुरक्षा रक्षकाला दिली.